गरोदरपणातील पाठदुखी, अशी घ्या काळजी
गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये पाठदुखी ही काही जणींना मोठ्या प्रमाणात होत असते. गरोदरपणात पाठदुखीचे प्रमाण अगदी 90 ते 95 टक्क्यांपर्यंत आहे. त्यापैकी 50 टक्के महिलांना पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे सहन करावे लागते. डॉक्टरांच्या मते महिला आपल्या पहिल्या प्रसूतीच्या वेळी पाठीच्या खालच्या भागातील दुखण्याला सामोर्या जातात. साधारणपणे गरोदरपणाच्या पाचव्या ते सातव्या महिन्यादरम्यान ही … The post गरोदरपणातील पाठदुखी, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.


गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामध्ये पाठदुखी ही काही जणींना मोठ्या प्रमाणात होत असते. गरोदरपणात पाठदुखीचे प्रमाण अगदी 90 ते 95 टक्क्यांपर्यंत आहे. त्यापैकी 50 टक्के महिलांना पाठीच्या खालच्या भागाचे दुखणे सहन करावे लागते. डॉक्टरांच्या मते महिला आपल्या पहिल्या प्रसूतीच्या वेळी पाठीच्या खालच्या भागातील दुखण्याला सामोर्या जातात. साधारणपणे गरोदरपणाच्या पाचव्या ते सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येते.
गरोदरपणात ज्या स्त्रियांना शारीरिक कष्टाचे काम करावे लागत असेल, त्यांना या अवस्थेत पाठदुखी होण्याचा संभव असतो. म्हणजेच कोणत्याही प्रकारची अतिरेकी हालचाल होता कामा नये. या पाठदुखीमध्ये तरुण वय आणि आधी झालेल्या अनेक प्रसूती हे कारण आहे. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास मातेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
गरोदरपणात पाठदुखी नियंत्रणात ठेवण्यासाठी बसताना किंवा उभे राहताना, चालताना अथवा झोपताना शरीराला सुयोग्य स्थितीत ठेवावे. पाठीच्या खालच्या भागातील दुखणे उद्भवू नये यासाठी प्रयत्न करावा. गरोदरपणात खूप काळ बसलेल्या स्थितीत राहाणे म्हणजे पाठदुखीला निमंत्रण. त्यामुळे इकडे तिकडे फिरणे योग्य ठरते. तुमच्या पाठीच्या कण्यावर अतिरिक्त भार येतो आणि पाठदुखी वाढते. केव्हाही बसताना पाठीच्या मागे उशी ठेवा. जेणेकरून तुमच्या पाठीला आधार मिळू शकेल.
गरोदरपणात पाठदुखी असल्यास सुरुवातीपासूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आणि सल्ल्यानुसार पाठीचे आणि ओटीपोटीचे व्यायाम करावेत. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेनुसारच हे व्यायाम करावे. यामुळे तुमच्या शरीराचा बांधा सुयोग्य राखतील आणि तुमची दैनंदिन कामे करणे तुम्हाला सोपे जाईल.
The post गरोदरपणातील पाठदुखी, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






