गोट्याने केला कहर..गांजाला आला बहर
पारनेर/जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे उसाच्या फडामध्ये केलेली गांजाची शेती पारनेर पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.12) दुपारी उद्ध्वस्त केली. शेतामधून 250 किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून, बाळू रामदास गोपाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणोरे येथील गाडीलगाव रस्त्यावरील गोपाळे मळ्यात नितीन उर्फ गोट्या गोपाळे याच्या शेतामध्ये उसाच्या फडात गांजाची शेती करण्यात … The post गोट्याने केला कहर..गांजाला आला बहर appeared first on पुढारी.


पारनेर/जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे उसाच्या फडामध्ये केलेली गांजाची शेती पारनेर पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि.12) दुपारी उद्ध्वस्त केली. शेतामधून 250 किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून, बाळू रामदास गोपाळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणोरे येथील गाडीलगाव रस्त्यावरील गोपाळे मळ्यात नितीन उर्फ गोट्या गोपाळे याच्या शेतामध्ये उसाच्या फडात गांजाची शेती करण्यात येत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून गोपाळे मळ्यात छापा टाकला. फडामध्ये जाऊन पाहणी केली असता तेथे सरीमध्ये गांजाच्या झाडांचे संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गांजाची सर्व झाडे तोडून जप्त केली. याप्रकरणी बाळू रामदास गोपाळे यास ताब्यात घेण्यात आले असून, उशिरापर्यंत पंचनामा तसेच फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. गाडीलगाव रस्त्यावर गोपाळे यांची सुमारे वीस एकर शेती आहे. त्या शेतीमधील उसाच्या फडात गांजाची शेती करण्यात येत होती.
या शेतीच्या आजूबाजूने इतर कोणीही जात नसल्याने गोपाळे यांचा हा उद्योग बिनबोभाट सुरू होता. मात्र, गुप्त बातमीदाराने गोपाळेंच्या या उद्योगाची पोलखोल केल्यानंतर पोलिसांनी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कारवाई केली. पारनेर तालुक्यात गांजा विकणारांचे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निघोज दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक हनुमंत उगले, गणेश डहाळे, मच्छिंद्र धुमाळ, मयूर तोरडमल व इतर कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
वर्षभरापूर्वी कारवाई बारगळली?
वर्षभरापूर्वी पारनेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गोपाळे याच्या शेतामध्ये आले होते. बराच वेळ थांबल्यानंतर ते निघून गेले. त्यामुळे ही कारवाई गोपाळे याने दडपली असावी, अशी कुजबूज सुरू होती.
हे ही वाचा :
Pawankhind | पावनखिंड संग्राम दिन विशेष : पन्हाळगड-विशाळगड रणभूमीचे जतन व्हावे
पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून अट्टल गुन्हेगाराची हत्या
The post गोट्याने केला कहर..गांजाला आला बहर appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






