घोगस पारगाव येथे शेतात गांजाच्या झाडांवर पोलिसांचा छापा ,554 किलो जप्त

बीड प्रतिनिधी:-घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे शेतामध्ये पोलिसांनी छापा मारला असता एकुण 554 कि. ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 27.27,700/- ( सत्ताविस लाख सत्ताविस हजार सातशे ) लागवड केलेला मिळुन आल्याने आरोपीस यातील आरोपी नामे संभाजी हरीभाऊ कराड, वय- 37 वर्ष, रा. घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे चकलंबा ता. गेवराई पोउपनि राजेश पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा. पोलीस अधिक्षक केज, श्री. पंकज कुमावत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे ईसम नामे संभाजी कराड याने त्याचे स्वत:चे मालकीचे शेतामध्ये बेकायदेशिर रित्या गांज्याची लागवड केली आहे. त्या अन्वये मा. सहा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी सदर बातमीची माहिती श्री नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांना देवून मा. पोलीस अधिक्षक साहेब, बीड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत साहेब सोबत, श्री. निरज राजगुरुसाहे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक, खाडे मॅडम, सपोनि एकशिंदे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे,, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांचे टिमने घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड येथे मिळालेल्या बातमीची खात्री करुन सदर शेतामध्ये छापा मारला असता एकुण 554 कि. ग्रॅ. गांजा ज्याची किंमत 27.27,700/- ( सत्ताविस लाख सत्ताविस हजार सातशे ) लागवड केलेला मिळुन आल्याने आरोपीस यातील आरोपी नामे संभाजी हरीभाऊ कराड, वय- 37 वर्ष, रा. घोगसपारगाव ता. शिरुर जि. बीड यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे चकलंबा ता. गेवराई जि.बीड येथे आलोत व पोउपनि राजेश पाटील यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत साहेब सोबत, श्री. निरज राजगुरु साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गेवराई, प्रो. पोलीस उपअधिक्षक, खाडे मॅडम, सपोनि एकशिंदे, पोउपनि इंगळे, पोउपनि तांगळे, पोउपनि राजेश पाटील, पोउपनि आनंद शिंदे, पोह येळे, खेळकर, पोलीस हेडकॉन्सटेबल बालासाहेब डापकर, पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक अनिल मंदे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते यांनी केली आहे.
What's Your Reaction?






