चोरट्यांची वक्रदृष्टी आता टोमॅटोकडे !
पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : सध्या टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकर्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. असे असतानाच चोरट्यांची वक्रदृष्टी आता टोमॅटोकडे वळली आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांच्या शेतातून तोड झालेले आणि निवड करून ठेवलेले टोमॅटोचे वीस क्रेट चोरून गेले. ही घटना रविवारी (दि. 16) मध्यरात्रीच्या सुमारास … The post चोरट्यांची वक्रदृष्टी आता टोमॅटोकडे ! appeared first on पुढारी.
पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : सध्या टोमॅटोच्या बाजारभावाने मोठा उच्चांक गाठला असल्याने शेतकर्याच्या या पिकाला सोन्याचा भाव मिळत आहे. असे असतानाच चोरट्यांची वक्रदृष्टी आता टोमॅटोकडे वळली आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांच्या शेतातून तोड झालेले आणि निवड करून ठेवलेले टोमॅटोचे वीस क्रेट चोरून गेले. ही घटना रविवारी (दि. 16) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. आजच्या बाजारभावानुसार ढोमे यांचे अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले आहेत.
या घटनेबाबत टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून ढोमे यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. सध्या टोमॅटो पिकाची तोडणी करून सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी योग्य निवड करून टोमॅटो क्रेट आपल्या वाहनातून घराजवळ आणून उभे केले होते. रविवारी रात्री 11 च्या सुमारास ढोमे हे गाडी व क्रेट व्यवस्थितरीत्या लावल्याची खात्री करून झोपले; मात्र, सकाळी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले क्रेट नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. टोमॅटोची क्रेटसह चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस पाटील सर्जेराव बोर्हाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांना घटनेची माहिती देत टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली. या घटनेचा तपास लावण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
शिवसेनेकडून पुण्याला मिळणार आमदार !
Ganeshotsav 2023 : यंदा १९ दिवस उशिराने गणपती बाप्पांचे आगमन
The post चोरट्यांची वक्रदृष्टी आता टोमॅटोकडे ! appeared first on पुढारी.
What's Your Reaction?