जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा पहाटे सांगाडा कोसळला
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत गुरुवारी( दि १३) ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र जेजुरी च्या पालखी मैदानावर व्यासपीठा समोर लोखंडी पिलर उभारून मंडपाचे काम सुरु असताना पहाटे तीन … The post जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा पहाटे सांगाडा कोसळला appeared first on पुढारी.
जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत गुरुवारी( दि १३) ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र जेजुरी च्या पालखी मैदानावर व्यासपीठा समोर लोखंडी पिलर उभारून मंडपाचे काम सुरु असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या शेडचा काही लोखंडी भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पहाटे नंतर युद्ध पातळीवर शेडचे काम पूर्ण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी जेजुरी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी जेजुरीच्या पालखी मैदानावर साडे आठ एकर जागेत १ लाख ५७ हजार स्केवर फुट क्षेत्रफळाचा मंडप उभारण्यात आला आहे. गेली आठ दिवस याचे काम सुरु आहे. या कार्यक्रमात आरोग्य शिबीर,रोजगार मेळावा,बचत गटांचे स्टँल,तसेच शासकीय योजनाचे प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. या मेळाव्यासाठी पन्नास ते साठ हजार लाभार्थी तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी,तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार आहेत. पुणे बारामती रस्त्यावर जड,अवजड व इतर वाहने बंद करण्यात येणार असून सुमारे सहाशे एस.टी. बस व इतर वाहनासाठी तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेजुरी मोरगाव रस्त्या नजीक हलीपडचे काम पूर्ण झाले आहे.
हे ही वाचा :
राष्ट्रवादीच्या फुटीमुळे दौंड भाजपाला अच्छे दिन?
नगर : तोफखान्याची ‘डिटेक्शन ब्रँच’ ‘कलेक्शन’ मोडवर
The post जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा पहाटे सांगाडा कोसळला appeared first on पुढारी.
What's Your Reaction?