नगर : काळ्या बाजारात रेशन नेणारा टेम्पो पकडला
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : शासकीय रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला टेम्पो कोतवाली पोलिसांच्या पथकाने कायनेटीक चौक परिसरात पकडला. मंगळवारी (दि.11) दुपारी ही कारवाई करण्यात आली. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना एक व्यक्ती टेम्पोतून शासकीय योजनेतील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन दौंड रोडने नगरकडे येत आहे. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे … The post नगर : काळ्या बाजारात रेशन नेणारा टेम्पो पकडला appeared first on पुढारी.
वाळकी : पुढारी वृत्तसेवा : शासकीय रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललेला टेम्पो कोतवाली पोलिसांच्या पथकाने कायनेटीक चौक परिसरात पकडला. मंगळवारी (दि.11) दुपारी ही कारवाई करण्यात आली. कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना एक व्यक्ती टेम्पोतून शासकीय योजनेतील रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन दौंड रोडने नगरकडे येत आहे. ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मनोज कचरे, सुजय हिवाळे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, सोमनाथ राऊत, संदीप थोरात, इनामदार यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठविले.
या पथकाने कायनेटिक चौक परिसरात सापळा लावला असता, काही वेळात एक मालवाहू टेम्पो येताना दिसला. त्याला या पथकाने थांबवले व टेम्पोत असलेल्या मालाची पाहणी केली असता, त्यात 40 पोती रेशनचा गहू, 1 पोते मका, 1 पोते ज्वारी, 1 पोते एरंड व 4 पोती हरभरा आढळून आला. या टेम्पोचालकाला ताब्यात घेतल्यावर त्याने त्याचे नाव लक्ष्मण अनिल कासार (रा.वाळकी, ता.नगर) असे सांगितले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी पो.कॉ. सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :
नाशिक : बनावट बँक खाते उघडून उद्योजकास अडीच कोटींचा गंडा
नियमबाह्य भरती; परभणीचे दोन शिक्षणाधिकारी निलंबित
The post नगर : काळ्या बाजारात रेशन नेणारा टेम्पो पकडला appeared first on पुढारी.
What's Your Reaction?