नगर : खरवंडी कासार परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

खरवंडी कासार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : खरवंडी कासार येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीची घटना घडली असून, एका घटनेत चोरांनी डॉ. सजंय घुले व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. चोराची संख्या जास्त असल्याने डॉ. घुलेंनी प्रतीकार न केल्याने घुले कुटुंब वाचले, घरात माणसे असतानाही चोर घरात घुसून चोरी करत असल्याने खरवंडी कासार परिसरातील ग्रामस्थांमध्ये … The post नगर : खरवंडी कासार परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

नगर : खरवंडी कासार परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

खरवंडी कासार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : खरवंडी कासार येथे एकाच रात्री दोन ठिकाणी चोरीची घटना घडली असून, एका घटनेत चोरांनी डॉ. सजंय घुले व त्यांच्या पत्नीस मारहाण केली. चोराची संख्या जास्त असल्याने डॉ. घुलेंनी प्रतीकार न केल्याने घुले कुटुंब वाचले, घरात माणसे असतानाही चोर घरात घुसून चोरी करत असल्याने खरवंडी कासार परिसरातील ग्रामस्थांमध्ये घाबराहटीचे वातावरण आहे.
रात्री दीडच्या सुमारास खरवंडी कासार येथील डॉ. संजय घुले यांच्या हॉलचा दरवाजा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला.

घरामधील हॉलचे व किचनचे सर्व वस्तू असता व्यस्त फेकून दिल्या. त्यामध्ये काही मिळते का हे त्यांनी पाहिले. यानंतर त्यांनी बेडरूमच्या चौकटीचे ग्रॅनाईट तोडून दरवाजाची कडी तोडून दरवाजा उघडला. यानंतर घुले व त्यांच्या पत्नी यांनी दरवाजा उघडू नये म्हणून खूप प्रयत्न केला; परंतु अंदाजे पाच ते सहा ते जण असल्याने या दोघांना तो दरवाजा उघडून धरणे शक्य झाले नाही. त्यांनी दरवाजा उघडताच प्रथम डॉ. घुले यांच्या हातावर काठीने वार केला. यानंतर डॉ. घुले जागेवर पडले. नंतर त्यांच्या पत्नीच्या हातावर काठी मारली. त्या दोघांच्या हाताला दुखापत झाली.

त्या दोघांनाही मारहाण केली. ‘तुमच्याकडे जे काही आहे, ते सर्व गुपचूप द्या, नाहीतर जीवे मारू,’ अशी धमकी चोरट्यांनी दिली. कपाटातील सव्वा तोळे दागिने व दहा हजार रुपये रोख, असा मुद्देमाल घेऊन चोरटे बाहेर निघून आले. बाहेर येताना डॉ. घुलेंचे वडील शेजारील रुममध्ये झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या रुममध्ये प्रवेश करून वडिलांच्या बोटामधील सात ग्रॅमची अंगठी चोरून नेली. त्यांनी दोन मोबाईल व फोर व्हीलर गाडीची चावी त्यांच्या समवेत नेली. यानंतर त्यांनी आपला मोर्चा जगताप गल्लीतील अशोक जगताप यांच्या बंद घराकडे वळविला. बंद दरवाजा तोडून घरामधील कपाटे तोडले. याठिकाणी त्यांना कही मिळले नाही.

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे आठ दिवसांमध्ये चार चोरीच्या घटना झाल्या असून, यामध्ये मालेवाडी येथील रावसाहेब खेडकर त्यांच्या कुटुंबासोबत कुलूप लावून पुण्याला गेले असता बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 75 हजारांची चोरी झाली होती. मागील आठवड्यात खरवंडी कासारमधून अण्णासाहेब सोनवणेंच्या घरासमोरून सायंकाळी एका म्हैस चोरी करून नेताना पकडण्यात आले. एकाच आठवड्यात चार चोरीच्या घटना घडल्या असून, खरवंडी परिसरातील सर्व नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलिस चौकीमध्ये कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचार्‍यांची नेमवणूक करावी, चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा खरवंडी कासारच्या ग्रामस्थांनी दिला. या घटनेची माहिती पाथर्डी पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलिस सुहास बटुळे, भाऊसाहेब खेडकर, आसाराम बटुळे, संदीप बडे आदींनी घटनेची पाहणी केली.

हे ही वाचा : 

INS Vs WI 1st Test : टीम इंडियाचा नवा अध्याय; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून

Sita Dahal : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या पत्नीचे निधन

The post नगर : खरवंडी कासार परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow