नगर : डाळिंब चोरणारी टोळी गजाआड
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : डाळिंब चोरणार्या टोळीला अवघ्या चोवीस तासांत पाथर्डी पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन तरूणांच्या एका टोळीने 31 हजार रूपये किमतीचे सुमारे पाचशे ते सहाशे किलो डाळिंब चोरून नेली. मात्र, पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवित अवघ्या चोवीस तासांत या टोळीतील तरूणांना अटक केली. तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील किशोर कारभारी कारखेले यांच्या … The post नगर : डाळिंब चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.


पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : डाळिंब चोरणार्या टोळीला अवघ्या चोवीस तासांत पाथर्डी पोलिसांनी अटक केली.
रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन तरूणांच्या एका टोळीने 31 हजार रूपये किमतीचे सुमारे पाचशे ते सहाशे किलो डाळिंब चोरून नेली. मात्र, पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवित अवघ्या चोवीस तासांत या टोळीतील तरूणांना अटक केली. तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील किशोर कारभारी कारखेले यांच्या डाळिंबाच्या बागेतील डाळिंब विक्रीस आली होती. दोन दिवसांपूर्वी ही डाळिंब अज्ञात आरोपींनी चोरून नेल्याची फिर्याद कारखेले यांनी दाखल केली होती. पोलिसांनी तपास लावत आरोपी संदीप नारायण कारखेले, राहुल पोपट शेरकर, नामदेव अंबादास कारखेले,ओंकार सुरेश कारखेले (सर्व रा.त्रिभुवनवाडी) यांनी चोरून नेल्याचे समजले.
या सर्वांना पोलिसांनी हिसका दाखविताच त्यांनी चोरलेली ही डाळिंब राहाता येथील बाजार समितीत लिलावात विकल्याची कबुली दिली.
या विक्रीतून आलेली 21 हजार रुपयांची रोकड व ज्या वाहनातून ही डाळिंब विकण्यासाठी नेली होती. ते बोलेरो पिकअप वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, कौशल्यराम निरंजन वाघ, पोलिस नाईक किशोर लाड, सुहास गायकवाड,भगवान सानप, विनोद मासाळकर, अतुल शेळके यांनी ही कारवाई करून आरोपीला अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक किशोर लाड करीत आहे.
हे ही वाचा :
राज्यात 47 टक्के पेरण्या पूर्ण; कापूस, सोयाबीन, तुरीच्या पेरणीवर भर
नगर : मालमत्ता करवाढीला तीव्र विरोध ; नगरपंचायतसमोर ग्रामस्थांनी मांडला ठिय्या
The post नगर : डाळिंब चोरणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






