नगर : तोफखान्याची ‘डिटेक्शन ब्रँच’ ‘कलेक्शन’ मोडवर
नगर : पुढारी वृत्तसेवा : तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी बोकाळली आहे. टोळक्यांकडून दिवसाढवळ्या धारधार शस्त्रे घेऊन दहशत पसरवली जात आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे पेव फुटले असून, याला गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांची कार्यशैली खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. ही पथके ‘डिटेक्शन’ सोडून ‘कलेक्शन’वर अधिक भर देत असल्यानेच गुन्हेगारांवर ‘खाकी’ची जरब राहिली नसल्याचे बोलले … The post नगर : तोफखान्याची ‘डिटेक्शन ब्रँच’ ‘कलेक्शन’ मोडवर appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी बोकाळली आहे. टोळक्यांकडून दिवसाढवळ्या धारधार शस्त्रे घेऊन दहशत पसरवली जात आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे पेव फुटले असून, याला गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांची कार्यशैली खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. ही पथके ‘डिटेक्शन’ सोडून ‘कलेक्शन’वर अधिक भर देत असल्यानेच गुन्हेगारांवर ‘खाकी’ची जरब राहिली नसल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी तसेच गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हे शोध पथकात फेरबदल केले. या पथकाचे प्रमुख पद सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्याकडे सोपविले.
मात्र, गेले पाच महिने या पथकाला आपली ‘चमक’ दाखविता आली नाही. पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, दरोडे, घरफोडी, मंगळसूत्र हिसकावणे, दुचाकी चोरी यांसह अन्य गुन्हे करणार्यांंवर नजर ठेवणे हे या पथकातील कर्मचार्यांचे मुख्य काम आहे; परंतु, हे कर्मचारी अवैध धंद्यांना खतपाणी घालत असून, त्या माध्यमातून मिळणारी गोड फळे चाखत असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे.
तसेच, वरिष्ठांना दाखविण्यासाठी काही दिवसांतून थातुरमातूर कारवाया केल्या जातात. गुन्हे शोध पथकाच्या या कार्यशैलीला वरिष्ठ पोलिस अधिकारी तर पाठबळ देत नाहीत ना? असाही प्रश्न या निमित्ताने लोकांमधून उपस्थित केला जात आहे.
अवैध धंद्यांना अच्छे दिन
तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारूची विक्री, पान टपर्यांवर अवैध गुटखा विक्री, अवैध मद्यविक्री अशा अवैध धंद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांना हे अवैध धंदे दृष्टीस पडत नाहीत का? असा प्रश्न आहे. त्यासोबतच हॉटेले रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही कारवाया करण्यात येत नाहीत. त्यामुळे अवैध धंद्यांकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे.
हे ही वाचा :
Anil Ambani | अनिल अंबानींची संरक्षण कंपनीही दिवाळखोरीत! राफेलचे काय होणार?
नगर : कांदा अनुदान, पीक विम्यासाठी वेठीस धरू नका : विवेक कोल्हे
The post नगर : तोफखान्याची ‘डिटेक्शन ब्रँच’ ‘कलेक्शन’ मोडवर appeared first on पुढारी.
What's Your Reaction?