नगर : मालमत्ता करवाढीला तीव्र विरोध
पारनेर : पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायतीनेे मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून, त्याच्या निषेधार्थ विरोधी नगरसेवकांच्या पुढाकारातून नगरपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (दि.12) ठिय्या आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसांत कर वाढ मागे न घेतल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यासंदर्भात प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. त्यात चालू वर्षीच्या नगरपंचायत हद्दीतील सदनिकांची घरपट्टी … The post नगर : मालमत्ता करवाढीला तीव्र विरोध appeared first on पुढारी.


पारनेर : पुढारी वृत्तसेवा : नगरपंचायतीनेे मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून, त्याच्या निषेधार्थ विरोधी नगरसेवकांच्या पुढाकारातून नगरपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (दि.12) ठिय्या आंदोलन करण्यात आले. पंधरा दिवसांत कर वाढ मागे न घेतल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यासंदर्भात प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. त्यात चालू वर्षीच्या नगरपंचायत हद्दीतील सदनिकांची घरपट्टी व व्यावसायिक गाळे यांच्या कराची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून, ती कमी करण्यात यावी. नगरपंचायत हद्दीमध्ये 10 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असून, तो एक दिवसाच्या अंतराने पूर्ण दाबाने करण्यात यावा, विकास आराखड्यामध्ये खासगी जागांवर टाकण्यात आलेले आरक्षण त्वरित रद्द करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांची पूर्तता 15 दिवसात न झाल्यास नगरपंचायात कार्यालयासमोर पारनेर ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष विजय औटी, नगरसेवक अशोक चेडे, युवराज पठारे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, देवराम ठुबे, ॠषिकेश गंधाडे, विशाल शिंदे, शंकर नगरे, ज्ञानेश्वर औटी, अॅड. सचिन पठारे, सुभाष औटी, किरण कोकाटे, अनिल गंधाडे, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर सातपुते, प्रकाश घोडके, अनिल भंडारी, विलास कटारिया, शेषमल बोरा, सचिन गांधी, संतोष गांधी, नितीन गांधी, संजय रूईकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
..तर पाणीटंचाई झाली नसती : पठाडे
हंगे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता. ते पाणी आरक्षित केले असते तर आज पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. माजी आमदार विजय औटी पंधरा वर्षांत पिण्याचे पाणीही आणू शकले नाहीत. एक वर्ष आमच्या हाती सत्ता द्या, शहराचा चेहरामोहरा बदलू, असे नगरसेवक युवराज पठारे म्हणाले.
ही हंग्याची ग्रामपंचायत आहे का?: औटी
चांगले काम करत असताना माझा राजीनामा घेतला. त्यावेळी कोणी माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. तुझा सव्वा वर्षाचा कालखंड संपल्याचे सांगण्यात आले. तुझे घेणे देणे नाही सांगायला ही काय हंग्याची ग्रामपंचायत आहे का? ही पारनेर नगरपंचायत आहे. दबावाचं काय कारण? असे माजी नगराध्यक्ष विजय औटी म्हणाले.
हे ही वाचा :
नियमबाह्य भरती; परभणीचे दोन शिक्षणाधिकारी निलंबित
पोलिसांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून अट्टल गुन्हेगाराची हत्या
The post नगर : मालमत्ता करवाढीला तीव्र विरोध appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






