नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार बेद्रेंच्या छायाचित्रांनी जगातिक स्थरावर तिसरे स्थान पटकाविले आहे. यामुळे या छायाचित्रांचा जगात डंका आहे.! रशियाच्या 35 फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटीने आयोजिलेल्या ‘35 अवॉर्डस’ या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये नगरमधील ओंकार रवींद्र बेद्रे यांच्या छायाचित्रांच्या सिरीजने (9 … The post नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका ! appeared first on पुढारी.

नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार बेद्रेंच्या छायाचित्रांनी जगातिक स्थरावर तिसरे स्थान पटकाविले आहे. यामुळे या छायाचित्रांचा जगात डंका आहे.! रशियाच्या 35 फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटीने आयोजिलेल्या ‘35 अवॉर्डस’ या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये नगरमधील ओंकार रवींद्र बेद्रे यांच्या छायाचित्रांच्या सिरीजने (9 छायाचित्रे) जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धेमध्ये 174 देशातील एक लाख चार हजार 814 छायाचित्रकारांनी सहभाग नोंदविला होेता. एकूण चार लाख 45 हजार छायाचित्र स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून आल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 नामांकीत छायाचित्रकारांनी केले. या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी काढलेला सूर्यास्ताच्या वेळी भारतीय लांडग्याचे छायाचित्रांची सिरीज जागतिक स्तरावर पहिल्या 35 छायाचित्रांच्या सिरीजमध्ये सामील झालेले असून, त्या सिरीजला जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला आहे.

सलग चौथ्या वर्षी यश
या स्पर्धेमध्ये दर वर्षी जगातील सर्वश्रेष्ठ 35 छायाचित्रांच्या सिरीज निवडतात आणि यावर्षी स्पर्धेमध्ये भारतातील चार छायाचित्रकारांचा समावेश असून, त्यापैकी नगरचा ओंकार जागतिक पातळीवर तिसर्‍या स्थानी आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार बेद्रेने सलग चौथ्या वर्षी मिळविलेल्या यशामुळे नगरचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे.

हेही वाचा :

Patra Chawl land scam case : पत्राचाळ प्रकरणी पुढील सुनावणी १७ ऑगस्टला होणार

Heavy rainfall: येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार

The post नगरच्या युवा वन्यजीव छायाचित्रकाराचा जगात डंका ! appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow