नित्य कर्म हेच शेतकऱ्यांचे पुण्य कर्म!ह भ प डोंगरे महाराज

नित्य कर्म हेच शेतकऱ्यांचे पुण्य कर्म!ह भ प डोंगरे महाराज

शेताकारी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. गाईचं, प्राण्यांचं, पक्षांचं, वनस्पतींचे पालन पोषण शेतकरीच करतो. आजही शेतकऱ्यांच्या दारातून कोणी उपाशीपोटी व मोकळ्या हाताने परत जात नाही. शेतकऱ्यांच्या मायमाऊल्या उदार अंतकरणाने धान्य, अन्नदान करतात त्यामुळे हे जे नित्य कर्म आहे तेच मोठे पुण्य कर्म आहे. शेतकऱ्यांना पुण्य मिळविण्यासाठी आणखी वेगळे काही करण्याची व शेती घरदार सोडून फिरण्याची गरज नाही असे प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज डोंगरे यांनी केले आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांचे वडील स्मृतीशेष बजरंग श्रीपती येडे यांच्या गंगापूजनाच्या निमित्ताने आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिवसंग्रामचे नेते प्रभाकर आप्पा कोलंगडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक प्रा. पंजाबराव येडे, बालाघाटावरील नेते बाळासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            पुढे बोलताना महाराज म्हणाले आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे शेतकरी या कृषी संस्कृतीचा वाहक आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा भक्तिमार्ग असो की शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचा मार्ग असो या दोन्ही मार्गात शेतकऱ्यांचे योगदान अनमोल आहे, शेतकरीच वारकरी होता आणि शेतकरीच मावळा होता. शेतकऱ्यांनी आपल्या मजबूत खांद्यांवरून स्वराज्याचं भगवं निशाण आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका निष्ठेने वाहिली ,ती मूल्ये, ते विचार जपले, नित्यनेमाने आपले पुण्यकर्म सुरू ठेवले तरीही लाखो शेतकरी आत्महत्या होतात मग शेतकऱ्यांचे पुण्य नेमके गेले कोठे ? तर पुण्य कमावण्यासाठी अज्ञानापोटी ज्या अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या, रूढी प्रथा परंपरांच्या, खुळचट कल्पनांच्या दृष्टचक्रात शेतकरी अडकला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पोखरली जात आहे. यातून शेतकरी बाहेर पडला तर शेतकऱ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या नित्यकर्मालाच पुण्यकर्म मानावे व पुण्यप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या अनावश्यक बाबींना फाटा द्यावा व आपला विकास साधावा जेणेकरून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पोखरली जाणार नाही. याप्रसंगी, गायक, वादक, टाळकरी व भाविक भक्त उपस्थित होते.

सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow