पाथर्डी तालुका : घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले
पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे वारंवार विजेच्या विविध समस्यांबाबत तक्रारी केल्या जातात, त्यावर म्हणावी तशी कारवाई होत नाही. खासदार, आमदारांनी सांगितलेल्या कामाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यापुढे दखल घेतली नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा … The post पाथर्डी तालुका : घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले appeared first on पुढारी.


पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्ग काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे वारंवार विजेच्या विविध समस्यांबाबत तक्रारी केल्या जातात, त्यावर म्हणावी तशी कारवाई होत नाही. खासदार, आमदारांनी सांगितलेल्या कामाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यापुढे दखल घेतली नाही, तर लोकप्रतिनिधी म्हणून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिला.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील घरगुती वीज वापरणार्या ग्राहकांना वीज वितरण कंपनीने अव्वाच्यासव्वा बिल देऊन आर्थिक लूट केले आहे. दिलेले बिल कमी करून द्यावेत, या मागणीसाठी दादा महाराज नगरकर यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी येथील वीज वितरण कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, माजी सदस्य विष्णुपंत पवार आदींच्या मध्यस्थिनंतर वाढीव वीज बिलाबाबत योग्य ती शहानिशा करून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्नवासन महावितरणचे अधिकारी मयूर जाधव यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी दादा महाराज नगरकर, सुभाष ताठे, मुकुंद आंधळे, गणेश चितळकर, प्रा. अरुण भवर, शामराव गरड, एकनाथ चितळकर, नामदेव काळे, अंकुश बोके, झुंबर राजळे, मदन म्हस्के, अशोक बेळगे आदी आंदोलनात उपस्थित होते.
नगरकर महाराज म्हणाले, वीज वितरण कंपनीकडून तिसगाव परिसरात वीज ग्राहकांना जास्तीचे अतिरिक्त बिल देण्यात आले. मागील तीन महिन्याचे आम्ही भरलेले वीज बले पाहिले तर चारचे ते सहाशे रुपये एवढे भरले आहेत. मात्र, आता ते दोन हजार रुपयांच्या जवळपास दिले गेले. मनमानी बिल देऊन वीज वितरण कंपनी ग्राहकांची लूट करत आहे.
घर बंद असलं तरी सरासरीचे बिल आमच्या माती मारले जातात, मेट्रो सिटीत राहणार्या वीज ग्राहकांना जेवढे बिले महिन्याला येत नाही तेवढे बिल आमच्या ग्रामीण भागातील लोकांच्या माथी मारण्याचे पाप वीज वितरण कंपनी करत आहे. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या बिलाबाबत मोठा सावळा गोंधळ वीज वितरणचा आहे. वीज ग्राहकांना दिलेली त्यावर कारवाई करून ती कमी करून द्यावी, अन्यथा आपल्या कार्यालयात आत्मदहन केले जाईल, असा इशारा नगरकर महाराजांनी दिला.
एकल वृद्ध महिलेला 15 हजारांचे बिल
कासार पिंपळगाव येथील झुंबर राजळे ही महिला एकटी राहत असून, तिला सुमारे 15 हजारांचे बिल देण्यात आले आहे. यापूर्वी ती महिला दरमहा अडीचशे ते तीनशे रुपये बिल नियमित भरत होती. आता, या महिलेला एक वर्षाचे बिल 15 हजार रुपये देण्यात आले. झुंबर राजळे यांना मुलगा नसून पतीचे निधन झाले आहे. त्या संजय गांधी निराधार योजनेच्या आर्थिक मदतीवर त्यांच्या जगण्याला आर्थिक आधार आहे. वीज वितरण कंपनीने अचानक एवढे बिल दिल्याने त्याही आवाक झाल्या असून, त्यांच्याकडे अव्वाच्या सव्वा दिलेले वीज बील त्याचे पैसे भरण्यासाठी नाही.
हेही वाचा
अहमदनगर : जि.प. सोसायटी सभासदांसाठी आधारवड
अहमदनगर : झेडपीच्या 80 शाळांना डिजिटल संसाधने
पंचायत निवडणूक मतदानावेळी हिंसाचार, ममता बॅनर्जी सरकारला उच्च न्यायालयाचा झटका
The post पाथर्डी तालुका : घरगुती ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






