पानशेत धरणफुटी : अक्षरश: इमारती डोळ्यांदेखत वाहून गेल्या..!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या इमारती वाहून गेल्या होत्या, वाडे जमीनदोस्त झाले. एवढा मोठा पूर येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुराचे थैमान सुरू होते. नंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली. जिथे बघावे तिथे चिखल व रोगराई पसरलेली होती. शनिवार पेठेत तर भयानक स्थिती होती. पर्वतीवर लोक आश्रयाला गेले होते, … The post पानशेत धरणफुटी : अक्षरश: इमारती डोळ्यांदेखत वाहून गेल्या..! appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या इमारती वाहून गेल्या होत्या, वाडे जमीनदोस्त झाले. एवढा मोठा पूर येईल, असे कोणालाच वाटले नव्हते. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुराचे थैमान सुरू होते. नंतर पाणी ओसरायला सुरुवात झाली. जिथे बघावे तिथे चिखल व रोगराई पसरलेली होती. शनिवार पेठेत तर भयानक स्थिती होती. पर्वतीवर लोक आश्रयाला गेले होते, अशी कटू आठवण पानशेत पूरग्रस्त रवी अग्निहोत्री यांनी जागवली.
पानशेत धरण फुटल्याने 12 जुलै 1961 रोजी थैमान घातले. यातून बचावलेल्या पूरग्रस्तांनी कटू आठवणी जागविल्या. कसबा पेठेतील कोंडेकर वाड्यात शब्दसारथीतर्फे आयोजिलेल्या मआठवणी पानशेत प्रलयाच्याफ या कार्यक्रमात आनंद सराफ आणि पराग पोतदार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. स्वाती पंडित, भारती माटे, वसंत डाखवे या पूरग्रस्तांनी आठवणी सांगितल्या.
माणसं जगवली, वाचवली…
भारती माटे म्हणाल्या की, साहित्य परिषदेसमोर आमचे चार मजली घर होते. मी आठ वर्षांची होते. पूर आला तेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा वडील घ्यायला आले होते. टिळक चौकातील विठ्ठल मंदिर येथून पाणी वाढत चाललेले. वडिलांनी आम्हाला सायकलवरून घरी आणले. विठ्ठलवाडीच्या मंदिरापासून पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत असल्याचे दिसले. आमचे घर उंचावर असल्यामुळे खूप उशिरा आमच्याकडे पाणी आले. दुसर्या दिवशीही धरण फुटले, अशी अफवा पसरली तेव्हा अनेक वाड्यांमध्ये खूप चोर्या झाल्या, घरफोडी झाली. वडील सामाजिक कार्यकर्ते असल्याने वडिलांनी घरात जे काही असेल ते देऊन माणसे जगवली, वाचवली.
स्वाती पंडित म्हणाल्या की, आईने तसेच वाड्यातील प्रत्येक बिर्हाडाने 40 पूरग्रस्त लोकांची सोय केली होती. आमच्या इथल्या एका दुकानदाराने दुकान बंद केले. पण, मागच्या दाराने दुकानदाराने सगळे पुरविले. एक कुटुंब असल्यासारखे वाड्यातील लोक वागत होते.
रेड लाइट एरियातील बायकाही मागे नव्हत्या. महिलांनी नदीची ओटी भरली की ती शांत होते, अशी कन्नड महिलांची धारणा होती, त्यामुळे त्या महिलांनी नदीची ओटी भरली. पूरग्रस्तातील काही महिलांनी दहीभाताचा नैवेद्य पाण्याला दाखविला होता, असेही पूरग्रस्तांनी सांगितले.
किसनरावांच्या कार्याची उपेक्षा
पेशवे उद्यानात होडीवर पर्यटकांसाठी नावाड्याचे काम करणार्या कै. किसनराव खमीतकर यांनी पानशेत पूर आल्यानंतर तीच होडी पुराच्या पाण्यात घालून तब्बल 175 जणांचे प्राण वाचविले. पण, त्यांना या शौर्याबद्दल काय मिळाले? तर होडी फुटली म्हणून मालकाने ताबडतोब नोकरीवरून काढून टाकले. इतकी वर्षे उलटूनही साधे शौर्यपदक देण्याचे औदार्यही सरकारने दाखवले नाहीत. ही उपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतर तरी थांबवून त्यांचा मरणोत्तर गौरव करावा, अशी मागणी खमीतकर कुटुंबीय करीत आहेत.
पानशेत धरणफुटीचा प्रलय आजही लोकांच्या स्मरणातून जात नाही. या प्रलयात अनेकांनी जीव गमावले. जीवाची पर्वा न करता अनेकांना जीवनदान देण्याचे मोलाचे काम किसनराव खमितकर यांनी केले. नावाडी असलेले किसनराव हे पेशवे उद्यान येथील तलावाच्या ठिकाणी पर्यटकांना होडीने सफर घडविण्याचे काम करत होते. पानशेत पुराच्या पाण्याने वेढलेल्या मंगळवार पेठ, भीमपुरा आणि इतर भागांतील लोकांचे प्राण किसनरावांनी होडीने वाचवले. पूर ओसरेपर्यंत त्यांचे हे कार्य सुरू होते. त्यांचे हेच कार्य म्हणून त्यांना ‘पानशेत हिरो’ ही ओळख मिळाली.
किसनरावांच्या कार्याची तेव्हाही आणि त्यांच्या निधनानंतरही सरकारने दखल घेतलेली नाही. पानशेत धरणफुटीच्या घटनेला बुधवारी (दि. 12) 62 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ने किसनरावांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. किसनरावांचे पुतणे संजय खमीतकर म्हणाले, काकांना पुणे महापालिकेने 2 ऑगस्ट 1961 रोजी 175 लोकांचे प्राण वाचविल्याचे प्रमाणपत्रही दिले. केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी नोकरी द्यावी आणि पुरस्कार द्यावा, यासाठी काकांनी मोठा लढा दिला. मी काकांबरोबर सरकारी अधिकारी, नेत्यांना भेटायला जायचो. तत्कालीन राष्ट्रपतींची भेट घेऊनही त्यांना न्याय मिळाला नाही.
त्यांना पुरस्कार किंवा सरकारी मदतही मिळाली नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन होऊन इतकी वर्षे उलटूनही सरकारने त्यांना न्याय दिलेला नाही. आतातरी या जिगरबाज हिरोची सरकारने दखल घेऊन त्यांना मरणोत्तर पुरस्कार द्यावा.
हे ही वाचा :
नाशिकच्या सप्तशृंगी घाटात बस दरीत कोसळली; १ प्रवासी ठार, २० ते २५ जण जखमी
अमरनाथला गेलेले नगरचे शंभर भाविक अडकले
The post पानशेत धरणफुटी : अक्षरश: इमारती डोळ्यांदेखत वाहून गेल्या..! appeared first on पुढारी.
What's Your Reaction?