पावसात भिजून सहानुभूती मिळते पण थोडीच : मंत्री छगन भुजबळ
संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जनतेचा विकास व्हावा, या एकमेव हेतूने आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे सांगतानाच पावसात भिजून थोडीफार सहानुभूती नक्कीच मिळते, मिश्किल टोमणा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नामोल्लेख टाळत शरद पवारांना लगावला. घरं फोडण्याची सुरुवात कोणी केली? याची आठवण करुन देतानाच भुजबळ यांनी चिमटाही काढला. सिन्नरमधील सत्कार आटोपून पुण्याकडे जाताना मंत्री भुजबळ … The post पावसात भिजून सहानुभूती मिळते पण थोडीच : मंत्री छगन भुजबळ appeared first on पुढारी.
संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जनतेचा विकास व्हावा, या एकमेव हेतूने आम्ही सरकारमध्ये सहभागी झाल्याचे सांगतानाच पावसात भिजून थोडीफार सहानुभूती नक्कीच मिळते, मिश्किल टोमणा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नामोल्लेख टाळत शरद पवारांना लगावला. घरं फोडण्याची सुरुवात कोणी केली? याची आठवण करुन देतानाच भुजबळ यांनी चिमटाही काढला. सिन्नरमधील सत्कार आटोपून पुण्याकडे जाताना मंत्री भुजबळ यांचे संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांमधून सामाजिक कार्याची दिशा मिळते, त्यामुळे सकाळी या दोन्ही ठिकाणी जावून आता आपण पुण्याकडे जात असल्याचे ते म्हणाले.
रस्त्यात जागोजागी होणारे सत्कार पाहता कार्यकर्त्यांना घेतलेली भूमिका मान्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. रविवारी शरद पवार यांच्या गटाकडून प्रसिद्ध झालेल्या पावसातील छायाचित्राबद्दल विचारले असता ‘साहेबांचे वय जास्त आहे, त्यामुळे पावसात भिजल्याने थोडीफार सहानुभूतीही मिळेल’ असे उपरोधिक उत्तर त्यांनी दिले. सुप्रिया सुळे यांच्या घर फोडले? या वक्तव्यावर बोलताना त्याची सुरुवात कोणी केली? असा प्रतिसवाल करीत भुजबळ यांनी स्व.गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांच्यापासून धनंजय मुंडे यांना बाजूला करण्याच्या प्रकाराची आठवणही करुन दिली.
काही मिनिटांच्या या संवादातून त्यांनी मूळ राष्ट्रवादीतील नेत्यांवर भुजबळांनी थेट टीका करण्याचे टाळले. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राज्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी आणि हितासाठी घेतल्याचा वारंवार पुनरुच्चार त्यांनी केला. संगमनेरातील समता परिषदेचे कार्यकर्त्यांनी भुजबळ यांचा सन्मान केला. राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी मात्र या सोहळ्याकडे पाठ दाखविल्याने संगमनेर राष्ट्रवादी कोणासोबत?, अशा चर्चाही सुरु झाल्या. या कार्यक्रमानंतर मंत्री भुजबळ पुण्याकडे रवाना झाले.
हेही वाचा
सांगली जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ची उभारणी शक्य
पश्चिमी वारे कमजोर झाल्याने राज्यात पाऊस कमी
सांगली : महापौर दालनात नगरसेवकाने लावला अजितदादांचा फोटो
The post पावसात भिजून सहानुभूती मिळते पण थोडीच : मंत्री छगन भुजबळ appeared first on पुढारी.
What's Your Reaction?