पिंपरी : पीएमपीच्या बेशिस्त वाहक, चालकांची तक्रार करा आणि मिळवा बक्षीस
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अनेकवेळा पीएमपीएमएलने प्रवास करताना प्रवाशांमध्ये तसेच वाहक, चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. अशा प्रकारे होणारे वाद रोखण्यासाठी तसेच चालक, वाहकांना शिस्त लावण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने वेगळीच शक्कल लढवली आहे. चालक, वाहक यांची वर्तणूक प्रवाशांसोबत चुकीची असल्यास त्याला पायबंद बसण्यासाठी तक्रार करा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पीएमपीएमएलने राबविली आहे. ज्या चालक आणि … The post पिंपरी : पीएमपीच्या बेशिस्त वाहक, चालकांची तक्रार करा आणि मिळवा बक्षीस appeared first on पुढारी.


पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अनेकवेळा पीएमपीएमएलने प्रवास करताना प्रवाशांमध्ये तसेच वाहक, चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. अशा प्रकारे होणारे वाद रोखण्यासाठी तसेच चालक, वाहकांना शिस्त लावण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाने वेगळीच शक्कल लढवली आहे. चालक, वाहक यांची वर्तणूक प्रवाशांसोबत चुकीची असल्यास त्याला पायबंद बसण्यासाठी तक्रार करा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पीएमपीएमएलने राबविली आहे.
ज्या चालक आणि वाहकांच्या विरोधात तक्रारी येतील त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे पीएमपीएमएल प्रशासनाने जाहीर केले आहे. पीएमपीएमएलचे चालक, वाहक यांच्या विरोधात सध्या तक्रारी वाढत आहेत. त्यामध्ये प्रवाशांसह बेशिस्त वर्तन करणे, खूप वेळ वाद घालणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे , बसथांब्यावर न थांबता पुढील मार्गावर जाणे, झेब—ा क्रॉसिंगवर बस थांबवणे, मार्गदर्शक फलक नसणे, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वाढल्याने ही योजना सुरू केली आहे. चालक आणि वाहकांबाबत प्रवाशांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची संपूर्ण पडताळणी करून नागरिकांना शंभर रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच संबंधित चालक आणि वाहक यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दंड वेतनातून कपात करण्यात येणार आहे.
कशी कराल तक्रार?
तक्रार करण्यासाठी प्रवाशांकडे बस क्रमांक, बस मार्ग , कोणत्या ठिकाणी आहे, फोटो, व्हिडीओ, दिनांक आदीमाहिती पीएमपीएमएलच्या https:// complaints.pmpml.org या संकेतस्थळावर पाठविता येणार आहे. तसेच, complaints@pmpml.org या इमेलवर तक्रार करता येणार आहे.
पीएमपीएमएलमध्ये चांगल्या सुधारणा व्हाव्या, चालक आणि वाहकांना शिस्त लागावी, त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी ही सेवा राबविली जात आहे.
– यशवंत हिंगे, पीएमपीएमएल आगार व्यवस्थापक, निगडी.
हेही वाचा :
जळगाव : तापीच्या उगमक्षेत्रात जोरदार पाऊस, हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले
पुणे : टोमॅटो दरवाढीचा कृषी आयुक्तांकडून आढावा
The post पिंपरी : पीएमपीच्या बेशिस्त वाहक, चालकांची तक्रार करा आणि मिळवा बक्षीस appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






