पिंपरी : संडे नाईट गुन्हेगार ऑल आऊट; पाचशेहून अधिक पोलिस रस्त्यावर
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 9) रात्री ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. यामध्ये पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अचानक केलेल्या या कारवाई गुन्हेगारांची चांगलीच पळापळ झाली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून मोका सारख्या कारवाईला जोरदार सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांची धरपकड … The post पिंपरी : संडे नाईट गुन्हेगार ऑल आऊट; पाचशेहून अधिक पोलिस रस्त्यावर appeared first on पुढारी.
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 9) रात्री ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले. यामध्ये पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अचानक केलेल्या या कारवाई गुन्हेगारांची चांगलीच पळापळ झाली.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून मोका सारख्या कारवाईला जोरदार सुरूवात केली आहे.
तर, दुसरीकडे ऑल आऊट ऑपरेशनच्या माध्यमातून सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल हद्दीत रविवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून कारवाईला सुरवात केली. दुसर्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत हे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरू होते.
सह आयुक्तांसह पाचशेहून अधिक पोलिस
‘ऑल आउट ऑपरेशन’मध्ये सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, डॉ. काकासाहेब डोळे, सर्व सहायक आयुक्त, तसेच सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, सर्व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार असे एकूण 69 पोलीस अधिकारी, 422 पोलीस अमंलदार हे सहभागी झाले होते.
एक हजड 878 वाहनांची तपासणी
‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये नाकाबंदी लावण्याचे आली होती. यामध्ये एक हजरी 878 वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच, 605 रेकॉर्डवरील आरोपी चेक केले. तर, 184 वाहनांवर मोटार व्हेईकल ऍक्ट प्रमाणे कारवाई करुन चार लाख 26 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय 103 हॉटेल लॉज चेकिंग, 70 संशयीत व्यक्ती तपासणी, 60हिस्ट्रीसिटर चेक केले. 57 अटक पाहिजे आरोपी, 3 फरारी आरोपी, 15 संशयीत वाहने ताब्यात घेतली. अकरा एन.बी.डब्ल्यु वॉरंट पैकी पाच वॉरंटची बजावणी केली. दोन आर्म ऍक्ट कारवाई, तीन महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
हेही वाचा
छगन भुजबळांपाठोपाठ धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन
पिंपरीत केवळ एकच अनधिकृत जाहिरात होर्डिंग
भिगवण : मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची उदासीनता
The post पिंपरी : संडे नाईट गुन्हेगार ऑल आऊट; पाचशेहून अधिक पोलिस रस्त्यावर appeared first on पुढारी.
What's Your Reaction?