पिंपरीत केवळ एकच अनधिकृत जाहिरात होर्डिंग
पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात एकच अनधिकृत होर्डिंग शिल्लक आहे. तसेच, परवानाधारक तसेच, अनधिकृत होर्डिंगचालक अशा एकूण 1 हजार 398 होर्डिंग चालक व मालकांनी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर केला आहे. दाखला न दिल्याने ते संबंधित सर्व होर्डिंग पाडण्यात आले आहेत, असा दावा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने केला आहे. शहरात एकूण 1 हजार 166 … The post पिंपरीत केवळ एकच अनधिकृत जाहिरात होर्डिंग appeared first on पुढारी.


पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात एकच अनधिकृत होर्डिंग शिल्लक आहे. तसेच, परवानाधारक तसेच, अनधिकृत होर्डिंगचालक अशा एकूण 1 हजार 398 होर्डिंग चालक व मालकांनी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर केला आहे. दाखला न दिल्याने ते संबंधित सर्व होर्डिंग पाडण्यात आले आहेत, असा दावा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने केला आहे. शहरात एकूण 1 हजार 166 परवाना असलेले अधिकृत जाहिरात होर्डिंग आहेत. त्यापैकी 1 हजार 136 होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला होर्डिंगचालकांनी सादर केले आहे. तर, 30 होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला देण्यात आला नाही.
त्यातील 14 होर्डिंग स्वत:हून काढून घेण्यात आले. तर, 15 होर्डिंगवर पालिकेने कारवाई केली. भोसरी भागातील एका अनधिकृत होर्डिंग पाडण्याचे शिल्लक आहे. उच्च न्यायालयात प्रकरण दाखल असलेले एकूण 464 अनधिकृत होर्डिंग होते. त्यापैकी प्रत्यक्षात 297 होर्डिंग उभे होते. तर, 167 होर्डिंग उभे नव्हते. एकूण 297 पैकी 281 होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला संबंधित मालक व चालकांनी सादर केला आहे. त्यातील 16 होर्डिंगचा दाखला प्राप्त झाला नाही. 12 होर्डिंग स्वत:हून काढून घेण्यात आले आहेत. पालिकेने 4 होर्डिंग पाडले आहेत.
तर, 281 पैकी केवळ 262 होर्डिंगचालकांनी एकूण 4 कोटी 19 लाख 50 हजार 816 रूपये परवाना शुल्क भरले. शुल्क न भरलेल्या 19 पैकी 14 होर्डिंग पालिकेने पाडले तर, 5 होर्डिंग स्वत:हून काढून घेण्यात आले, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशात होर्डिंगचा मुद्दा गाजणार
किवळे येथे 17 एप्रिल 2023 ला जाहिरात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला. तर, 3 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी राज्यभरातील विविध आमदारांनी येत्या सोमवार (दि.17) पासून होणार्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशात तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड, समाजवादी पक्षाचे आबू आजमी यांच्यासह 30 आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ही घटना कशी घडली. त्या प्रकरणी महापालिका प्रशासनाने काय कारवाई केली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तीन लाखांची मदत मिळाली का, असे प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यासंदर्भात उत्तर आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी आकाशचिन्ह व परवाना विभागाने केली आहे.
शहरात अनधिकृत होर्डिंगची संख्या मोठी
शहरात विनापरवाना जाहिरात होर्डिंग लावले जात आहे. गृहप्रकल्प किंवा व्यापारी संकुलाचे बांधकाम करताना त्या भोवती असंख्य जाहिरात होर्डिंग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. आकाशचिन्ह व परवाना विभागाने सोमवारी (दि.10) अशा होर्डिंगवर कारवाई केली. तसेच, परवाना घेतलेल्या आकारापेक्षा अधिक आकाराचे होर्डिंग शहरात अद्याप कायम आहेत. नदी पात्रात तसेच, इमारतीवर धोकादायक पद्धतीने होर्डिंग उभे आहेत. त्यामुळे शहरात केवळ एकच अनधिकृत होर्डिंग असल्याचा पालिकेच्या दाव्यावर शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा
भिगवण : मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची उदासीनता
सुरतच्या कंपनीने बनवले ‘चांद्रयान-3’चे फायरप्रूफ सिरॅमिक घटक
तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा आ. रोहित पवारांवर निशाणा
The post पिंपरीत केवळ एकच अनधिकृत जाहिरात होर्डिंग appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






