पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये बक्षीस
पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना आता पीएमपीकडून शंभर रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि चालक-वाहकांमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह हा नवीन उपक्रम राबवणार आहेत. पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारताच गेले दोन-तीन दिवस पीएमपीच्या सेवेची प्रत्यक्ष प्रवास करून पाहणी केली. यादरम्यान सिंह यांना … The post पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये बक्षीस appeared first on पुढारी.
पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना आता पीएमपीकडून शंभर रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. प्रवाशांना चांगली सुविधा मिळावी आणि चालक-वाहकांमध्ये सुधारणा व्हावी, याकरिता पीएमपीचे नवीन अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह हा नवीन उपक्रम राबवणार आहेत.
पीएमपी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार स्वीकारताच गेले दोन-तीन दिवस पीएमपीच्या सेवेची प्रत्यक्ष प्रवास करून पाहणी केली. यादरम्यान सिंह यांना अनेक चालक बेशिस्तपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नवीन अध्यक्षांनी हा उपक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना शंभर रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
असे होणार बक्षिसाचे नियोजन…
चालकाने केलेल्या बेशिस्तपणाबद्दल त्याच्या पगारातून दंडाची रक्कम वजा करण्यात येणार आहे. यामधील रक्कम तक्रारदार प्रवाशाला बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, असे पीएमपीचे नवे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दै.’पुढारी’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा:
पुणे : केडगावला नियोजनबद्ध विकासाची गरज
पुणे : उंडवडी क. प. ते फलटण रस्त्यावरील हजारो झाडांची होणार कत्तल
पुणे : पादचारी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत
The post पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये बक्षीस appeared first on पुढारी.
What's Your Reaction?