पुणे: तयारी अंतिम टप्प्यात असताना जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पुढे ढकलला;
पुढारी ऑनलाईन: जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. गुरुवारी १३ जुलैला जेजुरीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार होते. मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. जिल्हा प्रशासनाकडून शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी … The post पुणे: तयारी अंतिम टप्प्यात असताना जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पुढे ढकलला; appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन: जेजुरीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. गुरुवारी १३ जुलैला जेजुरीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार होते. मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
जिल्हा प्रशासनाकडून शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. सध्या पावसाचे दिवस असल्याने परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला होता. प्रत्येक तहसीलमधील नागरिकांना या कार्यक्रमासंदर्भातील माहिती देण्यात आली होती. सर्व तयारी अंतिम टप्प्यात असताना अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्यात आठ दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. जेजुरीत म्हणजेच पवारांच्या बालेकिल्ल्यात हा कार्यक्रम होणार होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सुधारित कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा:
नगर: कोपरगावात लव्ह जिहादची घटना, युवतीचे बळजबरीने धर्मांतर; दोघांना अटक
पीएमपी अध्यक्षांचा मोठा निर्णय: बेशिस्त चालकाची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला मिळणार शंभर रुपये बक्षीस
पुणे : केडगावला नियोजनबद्ध विकासाची गरज
The post पुणे: तयारी अंतिम टप्प्यात असताना जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पुढे ढकलला; appeared first on पुढारी.
What's Your Reaction?