पोटदुखीची कारणे आणि उपाय काय?

सर्वसाधारणपणे बद्धकोष्टता, विषबाधा, गॅसेस अचरट खाणे, मूतखडा, अतिआहार, दूषित पाणी आदी कारणांमुळे पोटाचे विकार होऊ शकतात. बाहेरगावी गेल्यावर पाणीबदलामुळे अनेकांचे पोट बिघडते. अशा वेळी फिल्टर वॉटर किंवा बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळेदेखील पोटात संसर्ग होतो आणि पोट दुखू लागते. (stomach pain) पोट दुखणे किंवा आखडणे ही बाब सामान्य आहे. अचानक पोटदुखीमुळे आपले … The post पोटदुखीची कारणे आणि उपाय काय? appeared first on पुढारी.

पोटदुखीची कारणे आणि उपाय काय?
समस्या पोटदुखीची

डॉ. भारत लुणावत

सर्वसाधारणपणे बद्धकोष्टता, विषबाधा, गॅसेस अचरट खाणे, मूतखडा, अतिआहार, दूषित पाणी आदी कारणांमुळे पोटाचे विकार होऊ शकतात. बाहेरगावी गेल्यावर पाणीबदलामुळे अनेकांचे पोट बिघडते. अशा वेळी फिल्टर वॉटर किंवा बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळेदेखील पोटात संसर्ग होतो आणि पोट दुखू लागते. (stomach pain)

पोट दुखणे किंवा आखडणे ही बाब सामान्य आहे. अचानक पोटदुखीमुळे आपले लक्ष विचलित होते आणि जोपर्यंत हे दुखणे थांबत नाही, तोपर्यंत आपण कोणतेही सामान्य काम करू शकत नाही. वेदनादायी असणार्‍या या आजारावर अनेक घरगुती उपचार आहेत. काही पारंपरिक तर काही आयुर्वेदात दिलेले आहेत. त्याचा प्रभावीपणे वापर करून आपण पोट आखडण्यावर सहज मात करू शकतो. कोणत्याही कारणामुळे पोट आखडू शकते. नेमके कोणत्या कारणामुळे हा आजार होतो, हे सांगणे कठीण आहे.

मात्र, सर्वसाधारणपणे बद्धकोष्टता, विषबाधा, गॅसेस अचरट खाणे, मूतखडा, अतिआहार, दूषित पाणी आदी कारणांमुळे पोटाचे विकार होऊ शकतात. बाहेरगावी गेल्यावर पाणी बदलामुळे अनेकांचे पोट बिघडते, असा अनुभव अनेकांना आला असेल. अशा वेळी फिल्टर वॉटर किंवा बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळेदेखील पोटात संसर्ग होतो आणि पोट दुखू लागते.

शक्यतो घरातील अन्न खाण्यावरच भर दिला पाहिजे आणि जर बाहेर जेवायचे असेल तर त्या हॉटेलची स्वच्छता आणि परिसर पाहणे गरजेचे आहे. तसेच बाहेरही मर्यादित प्रमाणात जेवावे, जेणेकरून पचनशक्ती बिघडणार नाही. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. अस्वच्छ हातामुळे संसर्गाची भीती असते. (stomach pain)

उपाय काय?

पोटदुखी सुरू झाल्यानंतर कोणताही पातळ पदार्थ काही काळासाठी खाणे टाळले पाहिजे. त्यानंतर पुन्हा खाण्यास सुरुवात कराल तेव्हा साधा आहार घ्या. वरणभात, केळी, टोस्ट यांचे सेवन करता येईल. दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे. फास्टफूड किंवा टोमॅटो खाण्यास प्रतिबंध करावा.

पोटदुखी कमी झाल्यानंतरही हलक्या आहारावर भर द्यावा. दिवसभरात थोडेथोडे खावे जेणेकरून पोटावर ताण पडणार नाही.

जड पेय टाळा. मद्यपानही वर्ज्य करायला हवे. शुद्ध पाणी किंवा द्रवपदार्थावर भर द्यावा.

पचनास जड असणारे पदार्थ खाण्याचे टाळावे. पचनाला हलके असणार्‍या पदार्थाचा आहारात समावेश करावा. रात्री कमी जेवावे.

अतिआहारामुळे पोट आखडण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला उलट्या होत असतील तर सहा तासांपर्यंत कोणताही पदार्थ खाऊ नये.

पोटाचे दुखणे कमी करण्यासाठी थोडा फिरण्यावर भर द्यावा. गार्डनमध्ये किंवा परिसरात फिरायला जावे. जेणेकरून पोट मोकळे होण्यास मदत होते. एकाच जागी बसून पोटदुखी वाढू शकते.

गॅसेसमुळे पोट दुखत असल्यास योग्य मार्गदर्शनाने काही योगासने केल्यासही आराम मिळतो.

पोटदुखीच्या काळात दही लाभदायक ठरते. दही हे प्रोबायोटिक मानले जाते. दह्यामध्ये मेथ्या भिजत घालून काही तासांनी खाल्ल्यानेही पोटदुखी कमी होते.

हेही वाचा : 

The post पोटदुखीची कारणे आणि उपाय काय? appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow