प्रलयाच्या आठवणींनी इतिहास जागा; पानशेत धरणफुटीला 62 वर्षे पूर्ण
दत्तात्रय नलावडे : खडकवासला : पानशेत धरण फुटीला बुधवारी (दि. 12) 62 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी नव्याने बांधलेले पानशेत धरण अतिवृष्टीने फुटले होते. त्यामुळे आलेल्या पुराने त्याच दिवशी खडकवासला धरण फोडावे लागले. पानशेत फुटीचे साक्षीदार असलेले जुन्या धरणाचे खांब आजही धरणाच्या भिंतीजवळ उभे आहेत. ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या जुन्या खडकवासला धरणाचे भग्न अवशेष धरणाखाली … The post प्रलयाच्या आठवणींनी इतिहास जागा; पानशेत धरणफुटीला 62 वर्षे पूर्ण appeared first on पुढारी.
दत्तात्रय नलावडे : खडकवासला : पानशेत धरण फुटीला बुधवारी (दि. 12) 62 वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी नव्याने बांधलेले पानशेत धरण अतिवृष्टीने फुटले होते. त्यामुळे आलेल्या पुराने त्याच दिवशी खडकवासला धरण फोडावे लागले. पानशेत फुटीचे साक्षीदार असलेले जुन्या धरणाचे खांब आजही धरणाच्या भिंतीजवळ उभे आहेत. ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या जुन्या खडकवासला धरणाचे भग्न अवशेष धरणाखाली आहेत. पानशेत, सिंहगड, खडकवासला भागातील वयोवृद्ध शेतकरी, महिला धरण फुटीच्या जुन्या कटू आठवणींचा इतिहास जागा करीत आहेत.
62 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 12 जुलै 1961 रोजी पानशेत धरण फुटले आणि प्रलयाने पानशेत, खडकवासला शिवणे, नांदेड भागांसह पुणे शहर व परिसरात हाहाकार माजवला होता. पानशेत रस्त्यावरील ओसाडे (ता. वेल्हे) येथील वयोवृद्ध शेतकरी सखाराम कृष्णाजी लोहकरे म्हणाले, की पानशेत फुटल्याची बातमी वार्यासारखी पसरली. नदीचे पाणी रस्त्यावर आले. पूर कमी करण्यासाठी खडकवासला धरण फोडले. त्यामुळे धरणात बुडालेले ओसाडजाई देवीचे शिवकालीन मंदिर उघडे पडले.
खडकवासला : अभ्यासकांचा विषय
दर्जेदार धरण बांधकाम व स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आजही खडकवासला धरणावर देश-विदेशातील अभ्यासक, तसेच अभियंते येतात. खडकवासला येथील भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत अनुसंधान केंद्रात देश-विदेशात उभारण्यात आलेल्या व येत असलेल्या विविध कालवे, धरण, जलविद्युत, नदीसुधार, बंदरे, समुद्रीय विकास आदी प्रकल्पाचे संशोधन, मॉडेल केले जात आहे. पानशेत धरण फुटीच्या दुर्घटनेनंतर दर्जेदार धरण बांधकामांचे मॉडेल म्हणून 144 वर्षांचे खडकवासला धरण जगभर प्रसिद्ध झाले आहे.
The post प्रलयाच्या आठवणींनी इतिहास जागा; पानशेत धरणफुटीला 62 वर्षे पूर्ण appeared first on पुढारी.
What's Your Reaction?