बार्शी नाक्यावर धनगर आणि वडार समाजाचे आमरण उपोषण

बीड (प्रतिनिधी) धनगर व वडार जमतीचा एस् टी प्रवर्गात आरक्षणाची अंमलबजावणी करा यासाठी भाई आकाश निर्मळ यांचे आमरण उपोषण २९ जून पासून बार्शी नाक्यावर सुरु आहे
गेल्या ३३ वर्षापासून धनगर व वडार जमातीचा एस् टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. या मागणीसाठी राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी बुधवार दिनांक २९ जून पासून बार्शी नाका येथे जुन्या आरटीओ मैदानावर भाई आकाश निर्मळ यांचे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण चालू आहे.मात्र आजपर्यंत शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.धनगर व वडार समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून या भटक्या जातीच्या समावेश एसटी प्रवर्गात करावा अशी गेल्या अनेक दिवसापासून मागणी होत आहे .मात्र या मागणीला राज्य सरकार सकारात्मक प्रतिसाद देत नाही .
या मागणीला अधिक धार आणण्यासाठी भाई आकाश निर्मळ यांनी धनगर आणि वडार समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा यासाठी अमर उपोषण सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसापासून हे उपोषण चालू असून ऑल इंडिया पॅंथर आर्मीचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनावणे, जय मल्हार युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुजी देवकते, शेतकरी कामगार पक्षाचे माजलगांव तालुका चिटणीस भाई लहुराव सोळुंके, यशवंत सेनेचे सरसेनापती गणेश कोळेकर पाटील वडार शैक्षणिक जनजागृतीचे अध्यक्ष दिपकराव चौगुले यांच्यासह विविध संघटनेचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सामान्य धनगर व वडार समाज बांधव उपोषण स्थळी भेट देत आहेत.
पण आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस उलटला तरी शासकीय यंत्रणा अजुनही निद्रावस्थेत असल्याने अद्यापही शासकीय व आरोग्य अधिकारी या उपोषणाकडे साधा फिरकला नाही. जोपर्यंत धनगर आणि वडार समाजाला जोपर्यंत एस् टी प्रवर्गाची आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही. तो पर्यंत आपण उपोषण सोडणार नाहीत असा पवित्रा भाई आकाश निर्मळ यांनी घेतला आहे.
What's Your Reaction?






