भोसरी : दरवाढ करा; पण जलतरण तलावाचे खासगीकरण नको
विजय जगदाळे भोसरी(पुणे) : कधी लाइटची समस्या… तर कधी पाणी खराब… तर कधी जलतरण तलाव बंद… सोयीसुविधांची वानवा… कर्मचार्यांची अरेरावी… सुरक्षारक्षकांची कामकाजात ढवळाढवळ… दुरुस्तीसाठी तलाव बंद अशा विविध समस्यांनी महापालिकेचे जलतरण तलाव ग्रासले आहेत. जलतरणपटूंना सुविधा देण्याऐवजी एकीकडे दरवाढ तर दुसरीकडे तलाव खासगीकरण करण्याचा डाव पालिकेच्या क्रीडा विभागाने घातला. यामुळे दरवाढ कराच; पण तलावाचे खसगीकरण … The post भोसरी : दरवाढ करा; पण जलतरण तलावाचे खासगीकरण नको appeared first on पुढारी.
विजय जगदाळे
भोसरी(पुणे) : कधी लाइटची समस्या… तर कधी पाणी खराब… तर कधी जलतरण तलाव बंद… सोयीसुविधांची वानवा… कर्मचार्यांची अरेरावी… सुरक्षारक्षकांची कामकाजात ढवळाढवळ… दुरुस्तीसाठी तलाव बंद अशा विविध समस्यांनी महापालिकेचे जलतरण तलाव ग्रासले आहेत. जलतरणपटूंना सुविधा देण्याऐवजी एकीकडे दरवाढ तर दुसरीकडे तलाव खासगीकरण करण्याचा डाव पालिकेच्या क्रीडा विभागाने घातला. यामुळे दरवाढ कराच; पण तलावाचे खसगीकरण करू नका, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
प्रशासनावर नागरिक नाराज
महापालिकेच्या क्रीडा विभागाच्यावतीने चालविण्यात येणारे जलतरण तलाव खासगीकरण करण्याचा हालचाली प्रशासनाचावतीने सुरू आहेत. क्रीडा विभागाने जलतरण तलावाचे दर एकीकडे वाढवली असून, दुसरीकडे खर्च परवडत नसल्याने काही तलावाचे खासगीकरण करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या या धोरणाचा तीव— शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे. खेळाडू व नागरिकांमधून विरोध होत असून महापालिका प्रशासनाने तलाव खासगीकरण करू नये तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिनी खासगीकरणाचा डाव हाणून पडला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने जलतरण तलावांचे खासगीकरण करू नये. महापालिकेने जलतरण तलावाचे दर नुकतेच 10 वरून 20 रुपयांपर्यंत वाढवले आहेत. त्यामुळे मिळणार्या उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न मिळणार आहे.– अॅड. सचिन गोडांबे, सामाजिक कार्यकर्ते45 मिनिटांची बॅच असताना अर्धा तासातच बाहेर काढले जात आहे. यापूर्वी एका तासाचे 10 रुपये घेतले जात होते. आता 30 मिनिटांसाठी 20 रुपये घेतात. याबद्दल संबंधितांना विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात. चौपट दरवाढ केली तशी सुविधा देण्याची गरज आहे.– अरविंद सणस, जलतरणपटूअनेक प्रकल्प दिमाखात उभे केले जातात. कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते आणि प्रकल्प पूर्ण झाला की संगममताने त्याचे खासगीकरण करण्यात येते. नफा कमावणे हे महापालिकेचे उद्दिष्ट नसले पाहिजे.– गिरीश वाघमारे, नागरिकसहा जलतरण तलावाचे खासगीकरण करण्यात येणार आहे. तलावाचे खासगीकरण करण्यात आले तरी नियंत्रण महापालिकेचे राहणार आहे. 45 मिनिट बॅच संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. तूर्तास तरी महिलांना पासमध्ये सवलत दिली जाणार नाही.– मनोज लोणकर, उपायुक्त, क्रीडा विभाग
हेही वाचा
The post भोसरी : दरवाढ करा; पण जलतरण तलावाचे खासगीकरण नको appeared first on पुढारी.
What's Your Reaction?