लोणावळा परिसरात चोर्यांचे सत्र सुरूच
लोणावळा : शहरात चोर्यांचे सत्र सुरूच असून रविवारी झालेल्या पाच चोरींच्या प्रकरणानंतर बुधवारी पुन्हा दोन चोर्यांचे प्रकार समोर आले आहेत. यात पहिल्या घटनेत नांगरगाव, लोणावळा येथील अंकित फ्लोरा सोसायटीमध्ये 2 ते 12 जुलै दरम्यान चोरी झाली आहे. एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत 2 लाख 82 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख … The post लोणावळा परिसरात चोर्यांचे सत्र सुरूच appeared first on पुढारी.
लोणावळा : शहरात चोर्यांचे सत्र सुरूच असून रविवारी झालेल्या पाच चोरींच्या प्रकरणानंतर बुधवारी पुन्हा दोन चोर्यांचे प्रकार समोर आले आहेत. यात पहिल्या घटनेत नांगरगाव, लोणावळा येथील अंकित फ्लोरा सोसायटीमध्ये 2 ते 12 जुलै दरम्यान चोरी झाली आहे.
एका बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत 2 लाख 82 हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी राजेंद्र दादूराव कानलकर (वय 52, रा. साईपार्क टाऊन किवळे, पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरी सोसायटीमधील फिर्यादींचा फ्लट बंद होता. आतमध्ये कोणीही नाही याचा अंदाज घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडत प्रवेश करत 1 लाख 5 हजार रुपयांची रोकड, सोन्याची चैन, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील रिंग असा 1 लाख 77 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. 12 जुलै रोजी चोरीचा हा प्रकार उघड झाला असून अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर करत आहेत.
पार्किंगमधील दुचाकी चोरी
दुसर्या घटनेत लोणावळा गावठाण भागात सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. ही घटना 10 जुलैच्या रात्री घडली. याप्रकरणी दानिश जाखीर शेख (वय 30, रा. लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावठाण येथील हॉन हाईटस अपार्टमेन्ट येथे पार्क करण्यात आलेली होंडा अॅक्टिवा (एमएच 14 सीबी 8189) ही चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलिस नाईक हनुमंत शिंदे तपास करत आहेत.
हेही वाचा :
पिंपरी-चिंचवड पोलिसांना प्रतीक्षा डॉग स्कॉडची
The post लोणावळा परिसरात चोर्यांचे सत्र सुरूच appeared first on पुढारी.
What's Your Reaction?