वेल्हे : खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक पाऊस
वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धरण क्षेत्रात सोमवारी (दि. 10) सकाळपासून पावसाचा ओसरला. त्यामुळे पाण्याची वाढ मंदावली आहे. सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 7.89 टीएमसी म्हणजे 27.08 टक्के पाणीसाठा झाला होता. जोरदार पावसाच्या पानशेत, वरसगाव, टेमघर खोर्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे, तर खडकवासला परिसरात उघडीप होती. सायंकाळनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र, वारेदेखील जोरदार … The post वेल्हे : खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक पाऊस appeared first on पुढारी.
वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धरण क्षेत्रात सोमवारी (दि. 10) सकाळपासून पावसाचा ओसरला. त्यामुळे पाण्याची वाढ मंदावली आहे. सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 7.89 टीएमसी म्हणजे 27.08 टक्के पाणीसाठा झाला होता. जोरदार पावसाच्या पानशेत, वरसगाव, टेमघर खोर्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे, तर खडकवासला परिसरात उघडीप होती. सायंकाळनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. मात्र, वारेदेखील जोरदार वाहत आहे. ओढ्या-नाल्यांमधून पाण्याचे मंद प्रवाह सुरू आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासांत खडकवासला धरण साखळीत 0.27 टीएमसी अधिक पाण्याची वाढ झाली.
पानशेत धरण खोर्यातील रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात पावसाळी वातावरण कायम असले, तरी तुरळक पावसाचा अपवाद वगळता उघडीप दिली. धरण साखळीत गतवर्षी आजच्या इतकाच जवळपास पाणीसाठा होता. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 10 जुलै 2022 रोजी धरण साखळीत 7.74 टीएमसी म्हणजे 26.56 टक्के साठा होता. सोमवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत टेमघर येथे 3, पानशेत व वरसगाव येथे प्रत्येकी 4 मिलीमीटर पडला. खडकवासलात पावसाची नोंद झाली नाही.
हेही वाचा
लोणी : आठ तासांच्या जनता दरबारात सुटले प्रश्न!
कोळपेवाडी : जवान आहेरांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
उत्तर भारतातील पुराने मध्य रेल्वेची दाणादाण, लांब पल्ल्याच्या गाड्यांना तब्बल १५ तास विलंब
The post वेल्हे : खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक पाऊस appeared first on पुढारी.
What's Your Reaction?