संगमनेर तालुक्यात 'या' तारखेपासून पूर्वेकडून येणार पाऊस : पंजाबराव डख
संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केलेल्या होत्या. मात्र पाऊस पडत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यामुळे १२ ते १५ जुलै या कालावधीत संगमनेर तालुक्यात पूर्वेकडून पाऊस येणार असल्याचा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी संगमनेर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात दिली आहे. संगमनेर येथील किसान ट्रॅक्टरच्या … The post संगमनेर तालुक्यात 'या' तारखेपासून पूर्वेकडून येणार पाऊस : पंजाबराव डख appeared first on पुढारी.


संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केलेल्या होत्या. मात्र पाऊस पडत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यामुळे १२ ते १५ जुलै या कालावधीत संगमनेर तालुक्यात पूर्वेकडून पाऊस येणार असल्याचा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी संगमनेर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात दिली आहे.
संगमनेर येथील किसान ट्रॅक्टरच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना डख एक म्हणाले की, महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये पाऊस झाला. परंतु अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या खरीपाच्या पेरण्या वाया जातात की काय याची भीती शेतकरी वर्गाला वाटू लागली होती. त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला होता.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरिपाच्या पेरण्यांना जीवदान मिळण्यासाठी १२ ते १५ जुलै २०२३ या कालावधीमध्ये पाऊस पडणार आहे. तीन दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा १८ जुलै ते २३ जुलै यादरम्यान पाऊस येणार आहे. नगर जिल्ह्यात विशेषत: पुर्वेकडून येणारा पाऊस नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. आता येणारे दोन्ही पाऊस हे पूर्वेकडून येणार आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही. भरपूर पाऊस पडणार आहे आणि या पावसाने राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खरिपाच्या पेरण्या होऊन जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले.
ऑक्टोबर पासून थंडी पडण्यास सुरुवात : डख
यावर्षी ऑक्टोबर पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे अजिबात गरज नाही आणि ऑक्टोबर महिन्याच्या नंतर खऱ्या अर्थाने थंडी पडण्यास सुरुवात होणारअसल्याचा ज्येष्ठ हवामानतज्ञ पंजाबराव ढग यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला
The post संगमनेर तालुक्यात 'या' तारखेपासून पूर्वेकडून येणार पाऊस : पंजाबराव डख appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






