संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, कावीळ या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून दूषित झाल्यास उलट्या, जुलाब असे त्रास होतात. त्यामुळे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी दूषित अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. महापालिकेच्या नळावाटे येणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, कॅनॉल … The post संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या! appeared first on पुढारी.

संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या!
DRINK WATER

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, कावीळ या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून दूषित झाल्यास उलट्या, जुलाब असे त्रास होतात. त्यामुळे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी दूषित अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या नळावाटे येणार्‍या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा.

बोअरवेल, कॅनॉल अशा शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.

सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या टाकीची सफाई करण्यात यावी.

शिळे किंवा उघड्यावरचे माशा बसलेले अन्न खाऊ नये.

पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घ्यावे.

नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.

ओल्या व सुका कच-याचे नियमित वर्गीकरण करावे

पाण्याचे साठे आठवड्यात किमान एकदा रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरणे.

प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.

जुलाब, विषमज्वर वगैरे आजार झाल्यास उपचार करून घ्यावेत.

The post संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्या! appeared first on पुढारी.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow