सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी पास, सुरक्षा दलात 1161 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

CISF Constable Recruitment 2025 : सुरक्षा दलात नोकरीची (security forces Job) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) द्वारे कॉन्स्टेबल/ट्रेड्समन भर्ती 2025 साठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता काय? या भरती मोहिमेद्वारे एकूण 1161 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या पदांचा समावेश आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. कोणत्या पदासाठी किती जागा? या भरती प्रक्रियेतून एकूण 1161 पदं भरली जातील. यामध्ये कॉन्स्टेबल /कुक 493 पदे, कॉन्स्टेबल / कॉबलर 9 पदे, कॉन्स्टेबल / टेलर 23 पदे, कॉन्स्टेबल / बार्बर 199 पदे, कॉन्स्टेबल / वॉशरमन 262 पदे, कॉन्स्टेबल / स्वीपर 152 पदे, कॉन्स्टेबल / पेंटर 2 पदे, कॉन्स्टेबल / कारपेंटर 9 पदे, कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 4 पदे, कॉन्स्टेबल / माळी 4 पदे, कॉन्स्टेबल / वेल्डर 1 पदं, कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 1 पदं, कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 2 पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे? जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यातच आले आहे. एस सी / एस टी / ExSM  या उमेदवारांना परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं नाही. सीआयएसएफच्या कॉस्टेबल पदातील 13 विविध सेक्शनसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे, या पदासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2025 म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे. त्यामुळं ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे, सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.  महत्वाच्या बातम्या: फक्त मुलाखत द्या, 55000 रुपयांची नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर     

सरकारी नोकरीची मोठी संधी, शिक्षण फक्त 10 वी पास, सुरक्षा दलात 1161 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

CISF Constable Recruitment 2025 : सुरक्षा दलात नोकरीची (security forces Job) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) द्वारे कॉन्स्टेबल/ट्रेड्समन भर्ती 2025 साठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरती मोहिमेद्वारे एकूण 1161 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या पदांचा समावेश आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

कोणत्या पदासाठी किती जागा?

या भरती प्रक्रियेतून एकूण 1161 पदं भरली जातील. यामध्ये कॉन्स्टेबल /कुक 493 पदे, कॉन्स्टेबल / कॉबलर 9 पदे, कॉन्स्टेबल / टेलर 23 पदे, कॉन्स्टेबल / बार्बर 199 पदे, कॉन्स्टेबल / वॉशरमन 262 पदे, कॉन्स्टेबल / स्वीपर 152 पदे, कॉन्स्टेबल / पेंटर 2 पदे, कॉन्स्टेबल / कारपेंटर 9 पदे, कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 4 पदे, कॉन्स्टेबल / माळी 4 पदे, कॉन्स्टेबल / वेल्डर 1 पदं, कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 1 पदं, कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 2 पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करु शकता.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये शुल्क आकारण्यातच आले आहे. 
एस सी / एस टी / ExSM  या उमेदवारांना परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं नाही. सीआयएसएफच्या कॉस्टेबल पदातील 13 विविध सेक्शनसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे, या पदासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2025 म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे. त्यामुळं ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे, सुरक्षा दलात नोकरी करण्याची इच्छा आहे, अशा तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जाऊन अर्ज करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

फक्त मुलाखत द्या, 55000 रुपयांची नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर 

 

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow