सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, निसर्ग सौंदर्याचा लुटताहेत आनंद
प्रसाद जगताप : पुणे : हिरवीगार वनराई, खोल दर्यांमधून झुळझुळ वाहणारे ओहोळ, धुक्यांमधील गारवा, रिमझिम पावसाचा शिडकाव यांचा आनंद घेत आणि सोबतीला मक्याची कणसे, कांदा भजी आणि पिठलं-भाकरीवर ताव मारत पर्यटक सिंहगड किल्ल्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंहगड किल्ला सध्या पावसाळ्यातील निसर्गसंपदेने नटला आहे. … The post सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, निसर्ग सौंदर्याचा लुटताहेत आनंद appeared first on पुढारी.


प्रसाद जगताप :
पुणे : हिरवीगार वनराई, खोल दर्यांमधून झुळझुळ वाहणारे ओहोळ, धुक्यांमधील गारवा, रिमझिम पावसाचा शिडकाव यांचा आनंद घेत आणि सोबतीला मक्याची कणसे, कांदा भजी आणि पिठलं-भाकरीवर ताव मारत पर्यटक सिंहगड किल्ल्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा सिंहगड किल्ला सध्या पावसाळ्यातील निसर्गसंपदेने नटला आहे. त्याने आपल्या अंगावर दाट ढगांचे धुके आणि हिरवागार शालू अंगावर पांघरला आहे. या निसर्गसंपदेचा आनंद लुटण्यासाठी पुणे व परिसरातील हजारो नागरिक दररोज हजेरी लावत आहेत. पुणे शहरापासून अवघ्या 20 ते 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांनी पावसाळ्यात गर्दी केल्याचे दिसत आहे.
किल्ल्यावरील सोयी सुविधा…
किल्ल्यावर थेट वरपर्यंत गाडी जाण्याची व्यवस्था
वनविभागाकडून दुचाकी चार चाकींना एन्ट्री फी
किल्ल्यावर वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग
शहरातून पायथ्यापर्यंत
पीएमपीची सार्वजनिक बस व्यवस्था
पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी
खासगी चारचाकी वाहनांची प्रवासी सेवा
कसे जायचे सिंहगडावर…
स्वारगेटवरून – (पीएमपी बस किंवा खासगी वाहनाने जाता येईल.) सारसबागेपासून दांडेकर पूलमार्गे सिंहगड रस्त्याने खडकवासला धरण येथून जाता येईल.
कात्रजवरून – कात्रज बायपास रस्त्याने वडगाव पूल येथून सातारा महामार्ग क्रॉस करून सिंहगड रस्त्याने जाता येईल.
पाहण्यासाठी आहे काय?
सुभेदार तानाजी मालुसरे स्मारक
छत्रपती राजाराम महाराज स्मारक
घोड्याच्या पागा
देवटाके (येथे बाराही
महिने थंडगार पाणी असते)
कोंढाणेश्वर हे शंकराचे मंदिर
टिळक बंगला
कल्याण दरवाजा
डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा
दारूचे कोठार
छोट्या छोट्या नैसर्गिक गुहा
पुणे दरवाजा
खंद कडा
झुंजार बुरुज
हे ही वाचा :
पुणे : आमदार नितेश राणे यांच्या विरोधात मध्यरात्री तृतीयपंथी समाजाचे जोरदार आंदोलन
पुणे : स्मार्ट सिटीचा स्मार्ट उपक्रम; नव्या तंत्रज्ञानाचे काम अंतिम टप्प्यात
The post सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, निसर्ग सौंदर्याचा लुटताहेत आनंद appeared first on पुढारी.
What's Your Reaction?






